Home > News Update > मठाधिपतीच्या मठात घुसून निर्घृण हत्या

मठाधिपतीच्या मठात घुसून निर्घृण हत्या

मठाधिपतीच्या मठात घुसून निर्घृण हत्या
X

पालघर येथे मागच्या महिन्यात साधूंच्या झालेल्या सामुहिक हत्येनंतर नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील नागठाणा बु. येथील बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांची रात्री दीड वाजेच्या सुमारास गळा दाबून खून करण्यात आल्याची घटना घडकीस आली. त्याच मठामधील बाथरुममध्ये एकाचा मृतदेह आढळून आल्याने नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

रविवारच्या रात्री नागठणा बु्रदुक्र येथील तरूणाने बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांच्या मठात शिरून त्यांच्याकडे असलेला ऐवज लुटल्यानंतर त्यांची गळा दाबून खून केला. तसेच महाराजांच्या उभ्या असलेल्या गाडीमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असताना शेजारी असलेले लोक जागे झाले. त्यामुळे हत्या करणार्‍याने तेथून पळ काढला. घटना रविवारच्या मध्यरात्रीनंतर घडली. बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांचे पार्थिक शरीर उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. खुनाची माहिती मिळताच भाविकांनी ग्रामीण रुग्णालय येथे मोठी गर्दी करण्यास सु रुवात केली.

मठात आणखी एकाचा मृतदेह

ज्या मठात शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून करण्यात आला. याच मठातील बाथरूममध्ये आणखी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आढळून आला आहे. या मयताचे नाव भगवान शिंदे असून ते रा.चिंचाळा येथील रहिवाशी आहेत.सदर घटने विषयी उमरी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Updated : 24 May 2020 7:55 AM GMT
Next Story
Share it
Top