Home > News Update > मुंबईकर तुम्हाला विचारतोय काय करुन दाखवलं? त्याचं उत्तर द्या! शेलारांचा सेनेवर निशाणा

मुंबईकर तुम्हाला विचारतोय काय करुन दाखवलं? त्याचं उत्तर द्या! शेलारांचा सेनेवर निशाणा

मुंबईकर तुम्हाला विचारतोय काय करुन दाखवलं? त्याचं उत्तर द्या! शेलारांचा सेनेवर निशाणा
X

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल पत्रकार परिषद घेत कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका केली होती. त्याला आज महाविकास आघाडी सरकारकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, (Jayant Patil) शिवसेनेकडून अनिल परब (Anil Parab) तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत राज्य सरकारची बाजू मांडली.

या पत्रकार परिषदेवरून भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय. 'मुंबईकर तुम्हाला विचारतोय की तुम्ही काय करून दाखवलं, त्याला उत्तर द्या' असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) निशाणा साधलाय.

गेली 20 वर्षे मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. सुमारे 33 हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मृतदेहाच्या बाजूला रुग्णांना उपचार दिले जात आहेत. हा आभास नाही तर सत्य आहे.

आभासी रडू नका, या सत्यावर बोला, अशा शब्दांत शेलारांनी शिवसेनेवर टीका केलीय.

Updated : 27 May 2020 4:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top