#Lockdown – १७ मेपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू

Courtesy: Socil Media

लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झालेला आहे पण तरीही दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत चाचली आहे. देशभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळत आहेत. त्यामुळे आता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात १७ मेपर्यंत कलम १४४ लागू केले आहे. पण तातडीच्या वैद्यकीय परिस्थितीत सवलत देण्यात येणार आहे, पण त्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही बिगर महत्त्वाच्या कामासाठी या काळात बाहेर पडता येणार नाही असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.