Home > News Update > मनसेचा मोर्चा CAAच्या समर्थनार्थ नाही – राज ठाकरे

मनसेचा मोर्चा CAAच्या समर्थनार्थ नाही – राज ठाकरे

मनसेचा मोर्चा CAAच्या समर्थनार्थ नाही – राज ठाकरे
X

मनसेतर्फे ९ फेब्रुवारी रोजी काढण्यात येणारा मोर्चा हा CAAच्या समर्थनार्थ नसल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. आज यासंदर्भात राज ठाकरेंनी (raj thackeray) मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे.

आपण सुधारित नागरिकत्व कायद्याचं समर्थन केलेले नाही, आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय. २३ जानेवारीला मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील घुसखोर मुस्लिमांना देशाबाहेर काढा अशी मागणी केली होती.

मनसेचा मोर्चा हा CAAच्या समर्थनार्थ नाही तर घुसखोर पाकिस्तानी आणि बांग्लादेशींना समर्थन देणाऱ्यांच्या विरोधात आहे, असंही राज ठाकरेंनी म्हटलंय CAA आणि NRC संदर्भात चर्चा होऊ शकते मात्र आपण त्याचं समर्थन केलेली नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलंय.

Updated : 28 Jan 2020 9:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top