Home > News Update > पदभार स्वीकारताच मंत्री यशोमती ठाकूर यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक, योजनांचा विभागीय स्तरावर घेणार आढावा...

पदभार स्वीकारताच मंत्री यशोमती ठाकूर यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक, योजनांचा विभागीय स्तरावर घेणार आढावा...

पदभार स्वीकारताच मंत्री यशोमती ठाकूर यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक, योजनांचा विभागीय स्तरावर घेणार आढावा...
X

महिला व बालविकास विभागासंदर्भात असणाऱ्या योजनांचा व कामकाजाचा विभागीय पातळीवर आढावा घेणार असल्याचं महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur)यांनी सांगितलं आहे. महिला व बालविकास विभागामार्फत विविध योजनांचे सादरीकरण सह्याद्री आथितिगृह येथे करण्यात आलं. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी कार्यभार घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच आढावा बैठक घेऊन कामकाजास सुरुवात केली.

राज्यगृह व संरक्षणगृह, निराश्रीत स्त्रियांसाठी प्रशिक्षण केंद्र, आधारगृह चालवणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना अनुदान, विविध व्यवसायभिमुख शिक्षण घेणाऱ्या महिलांना विद्यावेतन, देवदासी व त्यांच्या मुलांचे शिक्षण पुनर्वसन, स्वयंसिद्धा योजना, कामधेनू योजना व अन्य योजनांचे सादरीकरण विभागाद्वारे करण्यात आले.

हे ही वाचा

इराण- अमेरिका संघर्ष, कुणाचा तोटा, कुणाचा फायदा?

रवीश कुमार यांचा ब्लॉग : आपल्याच देशातील आठ राज्यांमध्ये पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना जाता येत नाही

इराण- अमेरिका संघर्ष, कुणाचा तोटा, कुणाचा फायदा?

शासकीय बालगृह व निरीक्षण गृह, निराश्रीत बालकांसाठी संस्थेतर सेवा (बालसदन बालकाश्रम), बालगृहं व जोपासना, अनाथालये व राष्ट्रीय शिशु कक्ष निधी अंतर्गत केंद्रिय अनुदान प्राप्त पाळणाघर योजना या सर्व बालविकासासंदर्भातील योजनांचे सादरीकरण देखील यावेळी करण्यात आले.

विविध विभागांची सद्यस्थिती सुरु असलेले कार्य व योजना यांची सविस्तर माहिती घेऊन विकासकामांच्या दृष्टीने उपाययोजनांच्या सूचना मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिल्या. सादरीकरणानंतर त्यांनी विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी महिला व बालविकास सचिव आय. ए. कुंदन, आयसीडीएस आयुक्त इंद्रा मालो तसेच बालहक्क आयोगाचे अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक, ‘माविम’ तथा महिला व बालविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Updated : 11 Jan 2020 4:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top