मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामधील बैठक संपली

आज राज्यातील कोरोना व्हायरस च्या परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये बैठक पार पडली. मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मारकांमध्ये ही बैठक पार पडली.

विशेष म्हणजे आज सकाळी खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर राऊत देखील या बैठकीला हजर होते. राज्यात देशात सर्वाधिक कोरोना चे रुग्ण आहेत. त्यातच काल विरोधी पक्षांनी राज्यात आंदोलन केलं. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे.

या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यासह मुख्य सचिव अजोय मेहता देखील उपस्थित होते.