मुंबई आणि उपनगरांना मिळणार निर्जंतुक केलेला भाजीपाला

24
मुंबई आणि ठाणे परिसराला फळे आणि भाजीपाल्याचा पुरवठा करण्याऱ्या नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. कृषी उत्पन्न बाजारपेठेत येणाऱ्या गाड्या आणि इथं असलेल्या कामगारांना संपूर्णपणे निर्जंतुक करण्यात आलं.
लॉकडाऊनदरम्यान मुंबई आणि उपनगरांना भाज्या आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होणार नाही यासाठी खबरदारी घेतली जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात गर्दी होऊ नये यासाठी वर्तुळ आखून ‘सोशल डिस्टनसिंग’ केलं जातंय. याशिवाय ग्राहकांचं थर्मल तापमानही तपासलं जातंय. कामगारांसाठी आणि ग्राहकांसाठी हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आणि मास्कचं वाटपही करण्यात येतंय.
संपूर्ण कामकाज लवकरात लवकर सामान्य करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी २४ तास कर्मचारी तैनात असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली. आवश्यकतेनुसार गाड्या बाजारपेठेत येतील आणि सुरक्षित वापस जातील, त्यांना पोलिसांकडून कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असंही दौंड यांनी सांगितलं.
या संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समितीचा आढावा घेतला आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी,
पहा व्हिडीओ

Comments