Home > News Update > “राम मंदिरासाठी अशुभ मुहूर्त निवडल्याने भाजप नेत्यांना कोरोना”

“राम मंदिरासाठी अशुभ मुहूर्त निवडल्याने भाजप नेत्यांना कोरोना”

“राम मंदिरासाठी अशुभ मुहूर्त निवडल्याने भाजप नेत्यांना कोरोना”
X

राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी 5 ऑगस्टचा मुहूर्त शुभ नाही, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजनाचा हट्ट धरु नये असे आवाहन काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी केले आहे. त्यामुळे राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्याची मागणीही त्यांनी केली आहे. “शेकडो वर्षांनंतर राम मंदिराचे बांधकाम होणार आहे, त्यामुळे यामध्ये पंतप्रधान मोदींनी विघ्न आणू नये” असा टोलाही दिग्विजय सिंह यांनी लगावला आहे. दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली आहे.

“ राम मंदिराच्या भूमिपूजनाला 5 ऑगस्टचा मुहूर्त अशुभ आहे, असे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद महाराज यांनी आधी सांगितले होते. तरीही पंतप्रधान मोदींच्या सोयीसाठी अशुभ मुहूर्त ठरवला गेला. हिंदू धर्मातील हजारो वर्षांच्या श्रद्धांपेक्षा मोदी मोठे आहेत का, हेच हिंदुत्व आहे का?” असा सवालही त्यांनी विचारला आहे. य़ाच सनातन धर्माच्या मर्यादांचे उल्लंघन केल्याने राम मंदिराच्या पुजाऱ्यांना कोरोना झाला, उत्तर प्रदेशच्या मंत्री कमला रानी वरुण यांचे कोरोनामुळे निधन झाले, उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, कर्नाटकचे मुख्यमंत्री....पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमच्या या अशुभ मुहूर्ताच्या हट्ट्पायी आणखी किती लोकांना हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहात? असा सवालही त्यांनी विचारलाय.

सध्याची परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी क्वारंटाईन का होऊ नये, नियम फक्त सामान्यांसाठी आहेत का? असा सवालही दिग्विजय सिंह यांनी विचारला आहे.

Updated : 3 Aug 2020 9:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top