Home > News Update > सिल्लोडमध्ये मायलेकींची हत्या; बलात्काराचा संशय ; बेपत्ता झाल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांची तीन दिवस टंगळमंगळ !!!

सिल्लोडमध्ये मायलेकींची हत्या; बलात्काराचा संशय ; बेपत्ता झाल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांची तीन दिवस टंगळमंगळ !!!

सिल्लोडमध्ये मायलेकींची हत्या; बलात्काराचा संशय ; बेपत्ता झाल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांची तीन दिवस टंगळमंगळ !!!
X

हैदराबाद बलात्कार प्रकरणात घटनेपूर्वी डाॅक्टर युवती बेपत्ता झाल्याच्या कुटुंबियांच्या तक्रारींवर पोलिसांनी तब्बल चार तास वेळकाढूपणा केला होता. कदाचित पोलिसांनी वेळीच शोधाशोध सुरू केली असती तर, घटना टळू शकली असती. मात्र या घटनेतून देशभरातील पोलिसांनी कोणताही धडा घेतलेला नाही. महाराष्ट्रात अशाच प्रकारची ताजी संतापजनक घटना घडलीय. शेतात काम करायला गेलेली मजूर महिला बेपत्ता झाली, पण "मिसिंग" दाखल करून पोलिस तीन दिवस टंगळमंगळ करत राहिले. अखेर शेतापासून तीन किलोमीटरवर एका विहिरीत मायलेकींची प्रेतं सापडली. हिंगणघाट, औरंगाबादमधील महिला अत्याचारांच्या घटनेनंतर ची सिल्लोडमधील ही नवी घटना आहे.

डोंगरगाव सिल्लोडमधील 32 वर्षीय महिला तिच्या सात वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन गवत आणायला गेली होती. शनिवारपासून ती बेपत्ता होती. पीडितेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंग केसपण दाखल केली होती. तीन दिवसांनंतर दोघीची प्रेतं एका विहिरीत आढळून आलीत.

"महिलेची जीभ बाहेर आलेली आहे. डोळे बाहेर आलेले आहेत. गुप्तांगात काड्याआढळून आलेल्या आहेत. सदर महिलेवर बलात्कार झालेला असावा व गळा आवळून हत्या करून मग विहिरीत फेकले गेले असावे, असा संशय सदर घटनेचा पाठपुरावा करणारे वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अमित भुईगळ यांनी व्यक्त केलाय.

या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे भुईगळ यांच्या सोबत ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार, वंचितचे जिल्हा अध्यक्ष योगेश बन, वंचितच्या महिला अध्यक्षा बामणे, पीपल्स व्हाईसचे रवी गायकवाड, संदीप शिरसाठ व वंचितचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पोलिसांना तपासातील दिरंगाईबद्दल धारेवर धरले. जोपर्यंत आरोपीचा छडा लावला जाणार नाही, तोपर्यंत प्रेत हातात घेणार नसल्याची भूमिका पीडितेच्या कुटुंबियानी घेतली.‌ इनकॅमेरा पोस्टमार्टमची मागणीही करण्यात आली. असं करता येत नाही म्हणून पोलिसांनी विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला अमित भुईगळ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून इनकॅमेराच पोस्टमार्टम करण्याची भूमिका सांगितली, तेव्हा पोलिस तयार झाले, अशी माहिती भुईगळ यांच्या फेसबुक पोस्टमध्ये सापडते.

मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना भुईगळ यांनी सदर घटनेला व माहितीला दुजोरा दिला असून, आपण पोस्टमार्टेमसाठी घाटी रूग्णालयात आलेलो असल्याचं सांगितलं. पोलिस उपनिरीक्षक इंगळे यांनीही मॅक्समहाराष्ट्र शी मायलेकींच्या हत्येच्या घटनेला दुजोरा दिलाय. सद्या दोघींच्या अपघाती मृत्यूची नोंद असून, पोस्टमार्टेमनंतर चित्र अधिक स्पष्ट होईल व त्यानंतरच संबंधित गुन्हा रीतसर दाखल करण्यात येईल, असं इंगळे यांनी सांगितलं. बलात्काराच्या शक्यतेवर ते म्हणाले की पोस्टमार्टेम अहवालानंतरच त्यावर मत व्यक्त करता येईल.

Updated : 18 Feb 2020 8:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top