मान्सून केरळात दाखल! महाराष्ट्रात कधी येणार…?

Courtesy : Social Media

शेतकरी राजा ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो. तो मान्सून आता केरळात दाखल झाला आहे. विशेष म्हणजे हवामान खात्यानं जो अंदाज वर्तवला होता. त्याच्या अगोदरच मान्सून केरळात दाखल झाला आहे.

येत्या 2 ते 4 जून दरम्यान राज्यात मान्सून दाखल होऊ शकतो. असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. 3 जूनला मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच कोकण, गोव्याच्या किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारतीय हवमान विभागाने (IMD) 1 जूनला मान्सून केरळात दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता. मात्र, सुपर सायक्लोन अम्फाननंतरही मान्सूनने केरळात दोन दिवसांपूर्वीच म्हणजे आज केरळ मध्ये आपली हजेरी लावली आहे. बंगालच्या खाडी मध्ये सुपर सायक्लोन आल्यानं मान्सून वर परिणाम होईल असा अंदाज लावला जात होता. मात्र, त्या अगोदरच मान्सून केरळ मध्ये दाखल झाला आहे.