News Update
Home > Election 2020 > मनसेचा भाजपसाठी ५६ मार्कांचा पेपर

मनसेचा भाजपसाठी ५६ मार्कांचा पेपर

मनसेचा भाजपसाठी ५६ मार्कांचा पेपर
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या नेत्यांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ‘लाव रे तो व्हिडीओ’च्या माध्यमातून घणाघाती टीका करत आहेत. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यात राज ठाकरेंनी सर्जिकल स्ट्राईकसंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही तासातच मनसेकडून भाजपला प्रत्युत्तर देतांना ५६ मार्कांचा पेपर सोडवण्याचं आव्हान देण्यात आलंय. ही प्रश्नपत्रिका पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सोडवायची आहे, त्यासाठी त्यांना दोन दिवसांचा कालावधीही देण्यात आला आहे. भाजपच्या नेत्यांवर आणि सरकारवर प्रश्न विचारण्यात आले आहेत. ही प्रश्नपत्रिकाच मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी ट्विटरवर पोस्ट केलीय.

Updated : 27 April 2019 10:14 AM GMT
Next Story
Share it
Top