Home > News Update > मनसे-राष्ट्रवादीच्या गोटात शिजतंय काय?

मनसे-राष्ट्रवादीच्या गोटात शिजतंय काय?

मनसे-राष्ट्रवादीच्या गोटात शिजतंय काय?
X

निवडणूक काळात मनसे (MNS)आणि राष्ट्रवादीची अघोषित आघाडीच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. अनेक जागांवर दोन्हीही पक्षांनी एकमेकांना जाहीर पाठींबा दिला होता. यामुळे दोन्ही पक्षातील नेत्यांचे संबंध चांगलेच जुळल्याचे दिसताहेत. मात्र यापुढे आता मनसे नेत्यांच्या भेटीगाठीही वाढत असल्याने मनसे-राष्ट्रवादीच्या गोटात नेमकं शिजतय काय? असे प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहेत.

दिवाळी पाडव्याच्या दिवशी पुण्यातील मनसे नेत्या रुपाली पाटील यांनीही गोविंदबाग येथे शरद पवारांची(shard pawar) भेट घेतली होती. यानंतर आज विधानसभा निवडणुकीतील मनसेचे उमेदवार आणि पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ‘पवारांच्या कार्यपद्धतीबाबत प्रभावित होऊन शरद पवार यांना भेटण्याची इच्छा होती’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

संदीप देशपांडे यांनी आज सकाळी मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या शरद पवारांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पवार आणि देशपांडे यांच्यात महाराष्ट्राच्या सरकारबंधणी आणि विरोधकांच्या भुमिकेविषयी राजकीय चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे. पुढाल ७-८ दिवसांत शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचीही भेट होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Updated : 30 Oct 2019 9:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top