Home > News Update > CoronaVirus - वैद्यकीय विद्यार्थी गेले सुट्टीवर...

CoronaVirus - वैद्यकीय विद्यार्थी गेले सुट्टीवर...

CoronaVirus - वैद्यकीय विद्यार्थी गेले सुट्टीवर...
X

राज्यात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे वैद्यकीय विद्यापिठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं आहे. वैद्यकीय विद्यार्थी कॉलेजसोडून घरी परत गेल्याचं चित्र मुंबईतील सर जे जे समुह रुग्णालय आणि सरकारी डेंटल कॉलेजमध्ये पहायला मिळालं.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर केली. पण, वैद्यकीय महाविद्यापिठाबाबत सरकारने अजून काहीही निर्णय घेतला नाही. त्यामुळे विद्यार्थीच नाही, तर पालकांमध्येही घबराटीचं वातावरण आहे. कोरोनाचा धोका आणि आजार पसरण्याची भीती यामुळे सध्याच्या परिस्थितीत वैद्यकीय विद्यार्थ्यांनी हाॅस्टेलमध्ये राहू नये अशी पालकांची इच्छा आहे.

याचसंदर्भात नाव न घेण्याच्या अटीवर एका वैद्यकीय विद्यार्थीनीने सांगितलं, “मुंबईत कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे माझे आई-वडील घाबरले आहेत. होस्टेलमध्ये एकाच रूममध्ये आम्ही राहतो. त्यामुळे आई-वडीलांचा घरी परतण्यासाठी दबाव वाढतोय. त्यामुळे आम्ही प्रशासनाकडे सु्ट्टीची मागणी केलीये.”

याबाबत माय मेडिकल मंत्राशी बोलताना मुंबईच्या शासकीय दंत महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ विवेक पाखमोडे, म्हणाले, “मुलांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. आम्हाला अजूनही मुलांना सुट्टी देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या नाहीत. याबाबत निर्णय झाल्यावर मुलांवर कारवाई करायची की नाही हे ठरवण्यात येईल. यासोबत परिक्षा पुढे ढकलण्याबाबत देखील अजून सूचना करण्यात आल्या नाहीत.”

तर, सर जे.जे समुह रुग्णालयाच्या अधीष्ठाता डॉ पल्लवी सापळे, म्हणाल्या “मुख्यसचिव आणि आणि आरोग्य सचिवांच्या सांगण्यानुसार एमयुएचएस अंतर्गत येणारी सर्व काॅलेज सुरु राहतील. त्यामुळे सध्यातरी मुलांच्या सुट्टीबाबत आम्ही काहीच निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही वैद्यकीय विद्यार्थ्यांना सुट्टी दिलेली नाही.”

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या या सुट्टीबाबत आरोग्य आणि शिक्षण संचालनालयाचे अतिरिक्त संचालक डॉ. तात्याराव लहाने म्हणाले, “वैद्यार्थ्यांच्या सुट्टीबाबत बुधवारी सरकारतर्फे निर्णय घेण्यात येईल.”

सौजन्य : माय मेडिकल मंत्रा

Updated : 18 March 2020 4:55 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top