Home > News Update > सुधीर सावंत यांचा राजीनामा मंजूर

सुधीर सावंत यांचा राजीनामा मंजूर

सुधीर सावंत यांचा राजीनामा मंजूर
X

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपींच्या वतीने कोर्टात याचिका दाखल करणाऱ्या सुधीर सावंत यांना अखेर आपच्या महाराष्ट्र समन्वयक पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा उघडकीस आणणाऱ्या आप च्या नेत्यानेच आरोपींच्या बचावासाठी प्रयत्न सुरू केल्याची बातमी मॅक्समहाराष्ट्र ने दिली होती. या बातमी नंतर सुधीर सावंत यांच्या कार्यपद्धतीवर पक्षाने गंभीर आक्षेप नोंदवले होते.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सुधीर सावंत यांचं वजन पक्षाने कमी करत नवीन समन्वयक मंडळ तयार केले आहे. सुधीर सावंत यांचा समन्वयक पदाचा राजीनामा ही पक्षाने मंजूर केला आहे.

संबंधीत बातमी वाचा -

महाराष्ट्र सदन घोटाळा – ‘आप’ ची सेटींग कुणासाठी ?

Updated : 28 Aug 2019 3:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top