Top
Home > Max Political > मॅक्स महाराष्ट्राला फेसबुकने केलेल्या ‘शिक्षे’तून (?) घ्यायचे धडे !

मॅक्स महाराष्ट्राला फेसबुकने केलेल्या ‘शिक्षे’तून (?) घ्यायचे धडे !

मॅक्स महाराष्ट्राला फेसबुकने केलेल्या ‘शिक्षे’तून (?) घ्यायचे धडे !
X

अगदी सोफिस्टिकेटेड कार घ्या आणि वापरा. पण, सायकल चालवण्याची सवय देखील सुरु ठेवा. पायी लांब अंतर कापायची सवय ठेवा !

ऐन निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मॅक्स महाराष्ट्रचे पेज फेसबुकने (Facebook) “कम्युनिटी गाईडलाईन”चे उल्लंघन केल्याचे कारण देऊन बंद केले होते, त्या घटनेची हवीतशी दखल घेतली गेली नाही.

प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध सतत आवाज उठवणाऱ्यांनी यातून काही धडे घेतले पाहिजेत

लक्षात घ्या आपण संघ / भाजप (BJP) विरुद्ध म्हणत नाही आहोत, कारण उद्या सत्ताधारी पक्ष बदलला तरी सामान्य लोकांच्या बाजूने बोलणारी, लोकशाही जिवंत राहण्यासाठी आपल्याला आपली व्यासपीठे लागणारच आहेत.

माझा मुद्दा वेगळा आहे

प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध तुम्ही वापरत असणाऱ्या साधनांचा रिमोट कंट्रोल प्रस्थापित व्यवस्था समर्थकांच्या हातात असेल तर ती साधने एक बटन दाबून, सॉफ्टवेअरची एक ओळ लिहून ते एका क्षणात बंद करू शकतात. नवीन जमान्यात या साऱ्या सर्व्हिस देणाऱ्या संस्था खाजगी कॉर्पोरेटस आहेत.

सार्वजनिक उपक्रम असतील तर सरकार दरबारी गाऱ्हाणं घालता येत, नागरिकांचा दबाव वाढवता येतो. लोकप्रतिनिधींमार्फत रदबदली करता येते. खाजगी कॉर्पोरेट्स त्यांच्या कृतीचे आपल्याला स्पष्टीकरण द्यायला देखील बांधील नसणार आहेत.

शब्द आणि विचार आपले असतील पण, शब्द हे सामाजिक व राजकीय जागृती करण्यासाठी असतात आणि ते ध्येय तेव्हाच साध्य होणार ज्यावेळी आपले शब्द लाखो कोट्यवधी नागरिक बांधवांपर्यंत पोचतील. त्यामुळे शब्द आणि विचार पोहचवण्याचा जुन्या पद्धती किमान जिवंत ठेवाव्या लागतील.

पूर्वीच्या कार्यकर्त्यांना आठवत असेल सुबक हस्ताक्षर असणारे स्टेन्सिलवर लिहायचे. त्याच्या सायक्लोस्टाइलिंग करून प्रती काढल्या जायच्या. हाताने लिहिणे, घरातले प्रिंटर्स, फोटोकॉपीयर, कागदांच्या हार्ड कॉपीज पोचवणे (मेल वरून पाठवलेल्या सॉफ्ट कॉपीज नव्हेत) (mail) या पद्धती जिवंत ठेवाव्या लागतील. केंद्रीकरण झालेली साधने वापरली तर ती कॉर्पोरेटच्या हातात असणार. विकेंद्रित साधने वापरू तेवढी ती आपल्या हातात राहणार..

Updated : 30 Oct 2019 7:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top