MaxMaharashtra Impact: फक्त बातमी नाही! तर दिव्यांगाना न्याय मिळवून दिला…

मॅक्स महाराष्ट्र ने 28 मे रोजी ‘लॉकडाऊन (lockdown) मुळे दिव्यांगावर उपासमाची वेळ’ हे वृत्त प्रसारीत केलं होतं. बातमी पाहून अंध बांधवांच्या मदतीसाठी प्रहार संघटना सरसावली असून अंध बांधवांना अन्नधान्य व अस्लम पठाण यांचा घराच्या डागडुगीचेकाम सुरू केले आहे.

अहमदनगर शहरात लॉकडाऊन असल्यामुळं त्यातच संपुर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर रेल्वेत चिक्की विकणारे दिव्यांग अस्लम पठाण यांचा व्यवसाय बंद झाला. घरी कमवते एकटेच असल्याने काम बंद झाल्यानंतर साठवलेले पैसे काही दिवसात संपले.

लॉकडाऊन वाढतच होते. त्यात अहमदनगर महानगरपालिकेकडुन येणार अनुदान देखील गेल्या काही महिन्यापासून मिळाले नसल्याने घरात काहीच शिल्लक राहिले नव्हते. अस्लम पठाण यांनी मॅक्समहाराष्ट्र च्या हेल्पलाईन नंबर वर कॉल केला. आणि काही तासातच मॅक्समहाराष्ट्रचे विशेष प्रतिनिधी रोहित वाळके त्यांच्या घरी पोहोचले.

संबंधित बातमीची लिंक

अंध व्यक्तीवर उपासमारीची वेळ

अस्लम पठाण यांची व्यथा मॅक्समहाराष्ट्र ने मांडल्यानंतर प्रहार संघटनेचे सोलापुरचे विनोद चव्हाण यांनी तातडीने फोन करून अस्लम पठाण यांची माहिती घेतली. अहमदनगर प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी यांनी तात्काळ अस्लम पठाण यांच्या घरी किराण्याची व्यवस्था केली. तसेच त्यांच्या घराची पाहणी केली असता, येत्या काही दिवसात पाऊस सूरू होईल. घराची हालत अत्यंत खराब असल्याने अस्लम पठाण यांच्या घराची दुरूस्ती करून देऊ असे सांगितले होते. आज प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे.

अस्लम पठाण यांच्याशी आम्ही जेव्हा संपर्क साधला आणि घराचं काम सुरु झालं आहे का? असं विचारलं असता त्यांचे डोळे भरुन आले. त्यांनी मॅक्समहाराष्ट्रा चे आभार मानले आहेत.