मॅक्समहाराष्ट्र हिरो | पार्थ पवार फाउंडेशन देतंय रोज १ हजार गरजूंना जेवण

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे बेघर, फुटपाथवर राहण्याऱ्या लोकांचे हाल होत आहेत. रोजगारही बंद असल्याने हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. या लोकांसाठी देशभरातील वेगवेगळ्या संस्था काम करत आहेत.
पनवेल शहरात पार्थ पवार फाउंडेशनच्या वतीने दररोज १ हजारहून अधिक गरजूंना जेवणाचे मोफत वितरण केलं जात आहे. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पनवेल, तळोजा टप्पा १, २, आणि एमआयडीसी भागात जेवणाचं वितरण केलं जातंय.

मर्यादित वेळेत आणि नियोजनबद्ध वितरण होत असल्याने यादरम्यान संचारबंदी आणि जमावबंदीचे उल्लंघन होऊ नये याची खबरदारीही घेतली जात आहे. याकरिता पोलिसांकडून महत्वाचं सहकार्य मिळत असल्याचं पार्थ पवार फाउंडेशनचे महेश पाटील यांनी सांगितलं.