मराठा आरक्षण प्रकरणाचे राज्यसभेत पडसाद

284

मराठा आरक्षणाला (maratha reservation) सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर त्याचे पडसाद आज राज्यसभेतही पाहायला मिळाले. खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले (sambhaji raje bhosale) यांच्यासह कॉंग्रेस (congress) खासदार राजीव सातव (rajeev satav) यांनी राज्यसभेत ‘झिरो तासां’च्या प्रश्नउत्तरात मराठा आरक्षणबाबत नोटीस दिली.

यावेळी संभाजीराजे भोसले यांनी तमिळनाडूला वेगळा व महाराष्ट्राला वेगळा न्याय का? असा सवाल उपस्थित करत मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी केली.

तर कॉंग्रेस खासदार राजीव सातव यांनी केंद्राने मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी. अशी मागणी केली आहे.

Comments