Home > Governance > महावितरणचा २ लाख ७३ हजार पूरग्रस्त ग्राहकांना वीजपुरवठा

महावितरणचा २ लाख ७३ हजार पूरग्रस्त ग्राहकांना वीजपुरवठा

महावितरणचा २ लाख ७३ हजार पूरग्रस्त ग्राहकांना वीजपुरवठा
X

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच कोकणातील महापुरामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणने प्रभावी व नियोजनबद्ध अंमलबजावणी केली असल्याने या भागातील म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील 24 व सांगली जिल्ह्यातील 10 अशी 34 उपकेंद्रे 13 ऑगस्टपर्यंत सुरु करण्यात आली आहेत. तर उर्वरित भागातील वीजपुरवठा 15 ऑगस्टपर्यंत सुरळीत केला जाईल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापुरातील 2884 व सांगलीतील 923 अशा एकूण 3807 रोहित्रांचा व 2 लाख 73 हजार 817 वीज ग्राहकांचा वीजपुरवठा आतापर्यंत सुरु केला आहे. स्वातंत्र्यदिनापर्यंत शेतीपंप वगळता पूर ओसरलेल्या भागातील वीजपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी कोल्हापूर-सांगलीतील 4 हजार महावितरणचे, दीड हजार कंत्राटी व शेजारच्या जिल्ह्यातून आलेल्या 40 पथकातील 500 हून अधिक कर्मचाऱ्यांची टीम अहोरात्र झटत आहे. या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही काळजी घेण्यात आली असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

कोल्हापूर व सांगली या दोन्ही जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील कृष्णा पंचगंगा, वारणा, भोगावती, कुंभी, कासारी, दुधगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, तांब्रपर्णी या नद्या आपल्या धोक्याच्या पातळीपेक्षा वर वाहू लागल्या.

Updated : 14 Aug 2019 5:53 PM GMT
Next Story
Share it
Top