Top
Home > News Update > महाविकास आघाडीचं आयटी सेल भाजपच्या वाटेवर

महाविकास आघाडीचं आयटी सेल भाजपच्या वाटेवर

महाविकास आघाडीचं आयटी सेल भाजपच्या वाटेवर
X

राज्यात आणि देशात भाजपच्या आयटी सेलकडून सोशल मीडियावर ज्याप्रकारे ट्रोलिंगसंस्कृती रुजवली गेली त्याची अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. एखाद्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी त्याच्याबद्दल सोशल मीडियातल्या वेगवेगळ्या माध्यमांत पोस्ट लिहीणे, फोटो-कार्टून पोस्ट करणे, चुकीची माहिती पसरवणे असे अनेक प्रकार गेल्या काही वर्षात आपण पाहिलेले आहेत.

असाच काहीसा प्रकार आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीच्या समर्थकांकडून केला जातोय. आज सकाळपासून #DevendraFadnavisForPM हा हॅशटॅग ट्विटरवर देशभरात पहिल्या क्रमांकावर होता. महाविकास आघाडीच्या समर्थकांनी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल केलं जातंय.

हे ही वाचा...

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस लागले कामाला

कांद्याने केला वांदा… डिसेंबरपर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ रहाणार

ठाकरे सरकारने ‘या’ दोन बाबींकडे दुर्लक्ष करता कामा नये – संजीव चांदोरकर

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सोशल मीडियावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांकडून आनंद व्यक्त केला जातोय. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून या समर्थकांनी #DevendraFadnavisForPM हा हॅशटॅग वापरून देवेंद्र फडणवीसांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. यामध्ये फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या जुन्या पोस्ट वापरून टीका केली जात आहे. फडणवीसांची व्यंगचित्रेही पोस्ट केली जात आहेत.

कालपर्यंत हीच मंडळी भाजपच्या आयटी सेलवर टीका करत होती. सत्ता हातात असल्याने अशाप्रकारे ट्रोलिंग केलं जातं अशाप्रकारचे आरोप या पक्षांकडून केले जात होते. मात्र, आता सत्ता आल्यानंतर ही मंडळीसुद्धा भाजपच्याच वाटेवर जाताना दिसत आहेत.

Updated : 29 Nov 2019 12:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top