Home > News Update > अर्णब गोस्वामी यांच्या अडचणी वाढल्या

अर्णब गोस्वामी यांच्या अडचणी वाढल्या

अर्णब गोस्वामी यांच्या अडचणी वाढल्या
X

रिपब्लिक (Republic) चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी (arnab goswami) यांच्या अडचणी आता वाढल्या आहेत, कारण त्यांच्याविरोधात महाराष्ट्र सरकारने सीआयडी (CID) चौकशीला परवानगी दिली आहे. आज्ञा नाईक यांनी केलेल्या तक्रारीत रिपब्लिक टीव्हीने पैसे थकवल्याने त्यांचे वडील आणि आजीने आत्महत्या केली असा आरोप करण्यात आला आहे. तसंच अलिबाग पोलिसांनी याची नीट चौकशी केली नाही, असे त्यांचे म्हणणे असल्याने बंद करण्यात आलेल्या या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी ट्विटमध्ये दिली आहे.

गेल्याच आठवड्यात सुप्रीम कोर्टाने अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला FIR रद्द करण्यास नकार देत अर्णब गोस्वामी यांना धक्का दिला होता. पालघर मॉब लिंचिंग (Palghar mob lynching) प्रकरण आणि तसंच वांद्रे स्टेशनवर झालेल्या गर्दी प्रकरणी केलेल्या वक्तव्यांमुळे अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात देशभरात विविध ठिकाणी FIR नोंदवण्यात आले होते. पण सुप्रीम कोर्टाने सर्व एफआयआर रद्द करत एक एफआयआर मात्र कायम ठेवून अर्णब यांना धक्का दिला होता. आता या आत्महत्या प्रकरणी सीआयडी चौकशीमुळे गोस्वामी यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

हे ही वाचा...


भारत चीन सोबत युद्ध करण्यास सीमा रेषेवर खरंच सक्षम आहे का?

…अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची ‘फोन पे चर्चा’

भारत चीन युद्ध होणार? चीनचा लष्कराला तयार राहण्याचा इशारा

Updated : 27 May 2020 10:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top