भाजपचा विधानसभेचा प्लॅन तयार! पाहा काय म्हणाले मुख्यमंत्री?

मिशन लोकसभा यशस्वी पूर्ण केल्यानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी आज महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी रणनिती ठरवली आहे. यासाठी त्यांनी या तीनही राज्यातील नेत्यांशी चर्चा केली. महाराष्ट्र भाजपच्या कोअर टीमने देखील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमध्ये शिवसेनेला सोबत घेत मित्र पक्षाचे उमेदवार निवडून कसे आणता येतील. या विषयावर चर्चा झाल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

भाजपचा आगामी विधानसभेचा प्लॅन तयार असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी आगामी अधिवेशनापुर्वी मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती दिली. तसंच नवा प्रदेशाध्यक्ष कोण असणार या वर भाष्य करण्याचे मात्र मुख्यमंत्र्यांनी यावर टाळले. या बेैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यातील भाजप कोअर टीमचे आणि इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते.