Home > News Update > मृतांच्या आकडेवारीचा घोळ, फडणवीस यांना काँग्रेसचे उत्तर

मृतांच्या आकडेवारीचा घोळ, फडणवीस यांना काँग्रेसचे उत्तर

मृतांच्या आकडेवारीचा घोळ, फडणवीस यांना काँग्रेसचे उत्तर
X

आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता मुंबईतील 950 हून अधिक कोरोना मृत्यू दडविण्यात आल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते. या पत्रात सुमारे 950 हून अधिक कोरोना बळी न दाखविता ते लपवून ठेवणे ही एक अतिशय गंभीर बाब असल्याचं या पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर असे एकूण 1328 मृत्यू हे अधिकचे कोरोनाचे मृत्यू म्हणून आता नोंदले जातील.

दरम्यान काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. " कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या आकड्यांची फेरतपासणी करण्याचा योग्य निर्णय शासनाने पूर्वीच घेतला होता. मुंबई महापालिकेचे ८ जूनचे व प्रधान सचिव आरोग्य यांचे ११ जून चे पत्र ( मुख्य सचिवांच्या १५ जूनच्या ५ वाजेपर्यंत फेरतपासणी पूर्ण करण्याचा स्पष्ट आदेशाचा उल्लेख) हेच दर्शवते." असे ट्विट करुन ती दोन पत्रंही प्रसिद्ध केली आहेत.

हे ही वाचा..

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांची आज चर्चा

ठाकरे सरकारने मृत्यूचा आकडा लपवला! देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नानंतर 1328 कोरोना मृत्यूची नोंद!

त्याचबरोबर, "विरोधी पक्षनेत्यांकरता सरकार बदलले तरी अजूनही काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून प्रत्येक महिन्याला होऊ घातलेल्या व आधीच सुरू असलेल्या प्रक्रियेची माहिती घेऊन तिचा खळबळ माजवण्याकरिता उपयोग केला गेला आहे. सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यावा. खाट कुरकुरण्याला हेही कारण आहे." असा टोला सरकारलाही लगावला आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

कोरोना साथीमुळे झालेले मृत्यू जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक प्रकरण हे मुंबई महापालिकेने गठीत केलेल्या ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे जाते. या समितीने प्रत्येक प्रकरणावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच तो मृत्यू कोरोनामुळे झाला, असे जाहीर केले जाते. आता दरम्यानच्या काळात सुमारे 451 अशी प्रकरणे आहेत, ज्यांचे मृत्यू कोरोनामुळे झाले. मात्र, ‘डेथ ऑडिट कमिटी’ने ती प्रकरणे नॉन-कोविड केली.

आयसीएमआरच्या निकषांप्रमाणे हे सर्व मृत्यू कोरोनामुळे झालेले आहेत. आता ही बाब उघडकीस आली आहे.

इतक्या मोठ्या संख्येने कोरोना बळी न दाखविण्याचे काम ‘डेथ ऑडिट कमिटी’ने कुणाच्या दबावात केले. या कमिटीवर काय कारवाई राज्य सरकारच्या वतीने केली जाणार आहे, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात.

Updated : 17 Jun 2020 2:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top