Home > News Update > राज्यात वातावरणातील बदलामुळे  काळजी घेण्याची गरज !

राज्यात वातावरणातील बदलामुळे  काळजी घेण्याची गरज !

राज्यात वातावरणातील बदलामुळे  काळजी घेण्याची गरज !
X

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशपातळीवर काम सूरू आहे. भारताात कोरोना बाधित संख्या १५४ तर राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ४५ वर पोहचली आहे. मात्र याबरोबर राज्यातील वातावरणात देखिल बदल होताणा दिसत आहे. राज्यातील जळगावसह काही भागात पावसाची पोषक स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईला देखिल या बदलत्या वातवरणाचा फटका बसत आहे. मुंबईत रात्री गारवा तर दिवसा उन्हाच्या चटक्यांनां सामोरे जावं लागतंय.

वातावरणातील सातत्याने बदल होत असून एकीकडे कोरोनाचा कहर असताना ईतर रोगांचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.रात्री थंडी आणि दिवसा उन्हाळा यामुळे व्हायरल आजारांचे प्रमाण वाढले आहे. कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असताना आपण गळ्याच्या समस्येकडे लक्ष देणं तितकचं गरजेचं आहे. व्हायरसचं इन्फेक्शन आणि वातावरणात होत असलेले बदल, बोलण्यासाठी त्रास होणं, घश्याला सुज येणं अशा समस्या उद्भवतात,विषम तापमानामुळे सर्दी, खोकल्याचं प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. असं विषम हवामान विषाणूंना पोषक असल्यामुळे काळजी घेण्याची जास्त आवश्यकता आहे.

राज्यात गेल्या पंघरा ते वीस दिवसापासून वातवरणात बदल होत आहेत. मुंबईसह अनेक भागात दिवसा आणि रात्रीच्या तापमाणात वाढ झाल्याची पहायला मिळते. विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भ,मराठवाडा पावसाची स्थिती कायम आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागात तापमाणात वाढ झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनूसार १९ मार्चलाही विदर्भाच्या काही भागात गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबईसह काही भागात दिवसाच्या सरासरी तापमाणात वाढ झाली आहे.

Updated : 19 March 2020 5:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top