Home > News Update > गणेश चतुर्थीला कापूस खरेदीला सुरुवात, पहिल्याच दिवशी 5 हजार रुपये भाव…

गणेश चतुर्थीला कापूस खरेदीला सुरुवात, पहिल्याच दिवशी 5 हजार रुपये भाव…

X

दरवर्षी गणेश चतुर्थीला राज्यात अनेक ठिकाणी कापूस खरेदी ला सुरुवात होते. खान्देशातील जळगाव जिल्ह्यात धरणगाव येथे खाजगी जिनिंग चालकांनी दरवर्षीप्रमाणे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर काटा पूजन करून कापूस खरेदीला सुरवात केली. पहिल्याच दिवशी नव्या कापसाला 5150 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. तर गेल्या हंगामातील पडून असलेल्या कापसाला कापसाची पत पाहून भाव मिळत आहे. गेल्या हंगामातील कापसाला 4700 ते 5100 रुपये भाव मिळत आहे.
आजच्या पहिल्याच दिवशी नव्या कापसाची 300 क्विंटल तर गेल्या हंगामातील जुन्या कापसाची 400 क्विंटल कापसाची आवक धरणगाव येथील श्री जिनिंग तसंच जी एस कॉटन या खाजगी जिनिंग मध्ये झाली आहे.

राज्य सरकार तसंच केंद्र सरकारन नव्या हंगामातील कापसाचा हमी भाव अद्य़ापपर्यंत जाहीर केलेला नाही. शासनाकडून नवरात्री किंवा दसरा सणावेळी हमी भाव जाहीर होतो. याच वेळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या घरात कापूस येण्यास सुरुवात होते. मात्र, खान्देशातील खाजगी व्यापाऱ्यांनी कापसाचे भाव 5150 रुपये जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना हा भाव परवडणारा नाही. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना किमान सात हजार रुपये भाव द्यावा ही सरकार कडे जुनी मागणी आजही कायम आहे.

Updated : 23 Aug 2020 2:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top