Home > News Update > मराठा आरक्षण: पार्थ पवार ठोठावणार सर्वोच्च न्यायालयाचं दार...

मराठा आरक्षण: पार्थ पवार ठोठावणार सर्वोच्च न्यायालयाचं दार...

मराठा आरक्षण: पार्थ पवार ठोठावणार सर्वोच्च न्यायालयाचं दार...
X

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यातच बीडमधील विवेक रहाडे या तरुणाने वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेचा पेपर अवघड गेल्यानं निराश होऊन आत्महत्या केली आहे.

विवेकने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा दावा त्याच्या नातेवाईकाने केला आहे. शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या विवेकने बारावीमध्ये उत्तम गुण मिळवले होते.

विवेकच्या आत्महत्येनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी या संदर्भात ट्विट करत मराठा आरक्षण प्रकरणात उडी घेतली आहे.

हे ही वाचा

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या विवेकची बातमी ऐकून धक्का बसला. अशा दुर्दैवी घटनांची साखळी सुरु होण्यापूर्वी मराठा नेत्यांना जागं व्हावं लागेल आणि त्यासाठी संघर्ष करावा लागेल. हे संकट सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पावलं उचलायला हवी. विवेकने आपल्या मनात प्रज्वलित केलेली ज्योत संपूर्ण यंत्रणा पेटवू शकते. संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आलं आहे. मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही.

असं म्हणत पार्थ पवार यांनी ‘मी मराठा आंदोलनाची ज्वलंत मशाल घेण्यास तयार आहे’. विवेक आणि इतर कोट्यवधी असहाय्य 'विवेक'साठी न्यायाचं दार ठोठावण्यासाठी तयार आहे. जय हिंद. जय महाराष्ट्र.

असं ट्विट पार्थ पवार यांनी केलं आहे. त्यामुळं मराठा आरक्षण प्रकरणात स्वत:चा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सत्तेत असताना पार्थ पवार पुन्हा एकदा वेगळी भूमिका घेताना दिसत आहे.

Updated : 1 Oct 2020 7:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top