Home > Election 2020 > फोटोग्राफर, शिवसेना पक्षप्रमुख ते मुख्यमंत्री...

फोटोग्राफर, शिवसेना पक्षप्रमुख ते मुख्यमंत्री...

फोटोग्राफर, शिवसेना पक्षप्रमुख ते मुख्यमंत्री...
X

शिवसेना (shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आज शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. ते महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री असतील. फोटोग्राफर, शिवसेना (shivsena) पक्षप्रमुख ते मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास राहीलेला आहे.

उद्धव ठाकरे यांना त्यांचे वडील, शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे, आणि आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा राजकीय समाजिक वारसा आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पायाभरणी केलेल्या आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाची धुरा श्री. ठाकरे यांनी मुख्य संपादक म्हणून सांभाळलेली आहे.

२७ जुलै १९६० रोजी मुंबईमध्ये उद्धव यांचा जन्म झाला. उद्धव जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् चे विद्यार्थी असून उत्तम फोटोग्राफर आहेत. त्यांनी काढलेल्या छायाचित्रांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अनेक मासिकांमध्येही त्यांनी काढलेले फोटो प्रसिद्ध झाले आहेत.

हे ही वाचा...

बुलेट ट्रेनच्या १० हजार कोटी रुपयातून शेतकऱ्यांची कर्जमाफी

देवेंद्र फडणवीस यांची विरोधीपक्षनेतेपदी निवड

सत्तेचं पहिलं पान शेतकऱ्याच्या कर्जमाफीने लिहलं जाईल

उद्धव ठाकरे यांचा विवाह सौ. रश्मी यांच्याशी झाला असून त्यांना आदित्य आणि तेजस ही दोन मुले आहेत. आदित्य ठाकरे आजोबा आणि वडिलांचा राजकारणाचा वसा पुढे चालवित आहेत. ते सध्या युवा सेनाप्रमुख असून वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या राजकीय जीवनाची सुरूवात विद्यार्थी दशेपासून झाली. शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रीय असलेल्या उद्धव यांच्याकडे २००२ च्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली. महापालिकेवर शिवसेनेची सत्ता स्थापन करत त्यांनी ती यशस्वीरीत्या पूर्ण केली.

२००३ मध्ये पक्षाने त्यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आणि २००४ मध्ये त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून घोषीत केले.

महाराष्ट्राच्या भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशा वेगवेगळ्या पैलूंचे छायाचित्रण त्यांच्या ‘महाराष्ट्र देशा’ या २०१० ला प्रकाशित झालेल्या पुस्तकातून दिसतं. यासोबत महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिकतेचा मानबिंदू असलेल्या ‘पंढरपूर वारी’चं आणि ग्रामीण महाराष्ट्राचं छायाचित्रण त्यांच्या ‘पहावा विठ्ठल’ या २०११ मधील पुस्तकात आलं आहे. आपल्या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून दुष्काळी भागातील शेतकरी आणि वन्यजीव संरक्षणासाठी निधी उभारून त्यांनी मदत केली.

शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शिवसेनेला अधिक सर्वसमावेशक करतानाच त्यांनी शिवसेनेला आधुनिकतेशी जोडले. युवक, कामगार आणि शेतकरी यांच्या प्रश्नांवर शिवसेनेनं उद्धव यांच्या नेतृत्वात काम केलं.

२००२ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी घेतली आणि विजयाचे शिल्पकार ठरले. राज्यात पक्षविस्तार केल्याने लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला चांगलं यश मिळालं. गेल्या ५ वर्षांपासून राज्यातील आणि केंद्रातील सरकारांमध्ये शिवसेना एक प्रमुख घटकपक्ष म्हणून सहभागी होता. राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाला भरघोस यश मिळालंय.

Updated : 28 Nov 2019 5:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top