Home > News Update > बलात्काराचा गुन्हा मागे न घेतल्यामुळे आरोपीने तरुणीवर फेकला ज्वलनशील पदार्थ

बलात्काराचा गुन्हा मागे न घेतल्यामुळे आरोपीने तरुणीवर फेकला ज्वलनशील पदार्थ

बलात्काराचा गुन्हा मागे न घेतल्यामुळे आरोपीने तरुणीवर फेकला ज्वलनशील पदार्थ
X

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये शिक्षिकेला भरचौकात जाळल्याची घटना आणि औरंगाबाद मध्ये महिलेच्या घरात घुसून तिला जाळल्याच्या घटनेने अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट आहे.

त्यातच ठाण्यातील मिरो रोडच्या काशीमिरा परिसरात बलात्काराचा गुन्हा मागे न घेतल्यामुळे आरोपीने तरुणीवर ज्वलनशील पदार्थ फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेने बलात्काराच्या गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्यानं 26 वर्षीय पीडितेवर आरोपीने ज्वलनशील पदार्थ फेकला आहे.

या घटनेत ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरू आहे. आरोपीला काशीमिरा पोलिसांनी अटक करून पुढली तपास सुरु केला आहे.

मात्र, या घटनेने महाराष्ट्रात अन्याय अत्याचार झाल्यास पोलिसांकडे दाद मागायची की नाही? हा सवाल देखील उपस्थित झाला आहे. पीडितेने बलात्कारासारखी घटना घडल्यानंतर न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

मात्र, पोलिसांनी बलात्कारासारखं कृत्य करणाऱ्या आरोपीला मोकळा का सोडला? या महिलेला पोलिसांनी संरक्षण का दिले नाही. असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात.

Updated : 5 Feb 2020 4:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top