अर्थ संकल्पात शिव स्मारक आणि इंदू मिल स्मारक बाबत चकार शब्द नाही

Courtesy : Social Media

महाविकास आघाडी सरकारचा आज (06 मार्च) पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पात शेती, जलसिंचनावर भर आहेच, मात्र पहिल्यांच पर्यटनावर विशेष लक्ष दिल्याचं पाहायला मिळालं.

या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. मात्र या अर्थसंकल्पामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल स्मारकाचा उल्लेख दिसून येत नाही यासंदर्भात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी” हा निधी या अगोदर देण्यात आलेला आहे त्यामुळे आजच्या अर्थ संकल्पात काह प्रश्न उपस्थित होत नाही”असं भाष्य केलं आहे.

हे ही वाचा…