Home > News Update > राहुल कुलकर्णींना अटक करून महाराष्ट्र सरकारने चूक केली - रवीश कुमार

राहुल कुलकर्णींना अटक करून महाराष्ट्र सरकारने चूक केली - रवीश कुमार

राहुल कुलकर्णींना अटक करून महाराष्ट्र सरकारने चूक केली - रवीश कुमार
X

एबीपी माझाचे (ABP Majha) पत्रकार राहुल कुलकर्णी (Rahul Kulkarni) यांना रेल्वेसुरू होण्यासंदर्भात चुकीची माहिती दिल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या बातमीमुळे बांद्रा येथे गर्दी जमल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यानंतर सोशल मीडिया आणि देशभरातील प्रसारमाध्यमांमधलं वातावरण ढवळून निघालं आहे. काही पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्या समर्थनार्थ तर काही विरोधात व्यक्त होत आहेत.

एनडीटीव्हीचे ज्येष्ठ पत्रकार आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते रवीश कुमार (Ravish Kumar) यांनी महाराष्ट्र सरकारने राहुल कुलकर्णी यांच्यावर केलेली कारवाई चूक असल्याचं म्हटलंय. राज्य सरकारला कारवाई करायची होती तर बांद्रा प्रकरणाला धार्मिक रंग देणाऱ्या माध्यमांवर करायला हवी होती असं रवीश यांनी म्हटलंय.

अनेक मोठे संपादक यासंदर्भात ट्विट करत होते, मात्र त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही. बातमी देताना मानवीय चूक होऊ शकते, मात्र त्याची शिक्षा जेल नाही. राहुल कुलकर्णी यांनी मोहरा बनवू नये असं रवीश यांनी म्हटलंय. ज्या अँकरनी मजुरांच्या वस्तुस्थितीला दुर्लक्ष करत या घटनेला धार्मिक रंग दिला तो अपराध आहे असं रवीश यांनी म्हटलंय.

Updated : 16 April 2020 7:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top