Home > News Update > सरकारला एका बसचा खर्चही शक्य नाही?

सरकारला एका बसचा खर्चही शक्य नाही?

सरकारला एका बसचा खर्चही शक्य नाही?
X

कोरोनाचे संकट गंभीर झाल्यामुळे सरकारने राज्यातले सगळेच उत्सव अत्यंत साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन केलं. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पायी वारीचा सोहळा देखील वारकऱ्यांनी सरकारच्या आवाहन खातर रद्द केला. एवढेच नाही तर मानाच्या नऊ पालख्यांसोबत देखील फक्त वीस लोक जातील असेहा ठरवण्यात आले. सरकारच्या या सगळ्या आवाहनाला, सगळ्या निर्णयांना वारकऱ्यांनी पूर्णपणे सहकार्य केलं.

वारकऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर सरकारतर्फे या पालख्यांना नेण्यासाठी बस किंवा हेलिकॉप्टरची सोय केली जाईल असं सांगितलं गेलं होतं. पण आता एक धक्कादायक माहिती उघड झालेली आहे. या मानाच्या पालख्यांना विठ्ठल चरणी जाण्यासाठी एसटी महामंडळाने तिकीट काढायला लावलेला.

धक्कादायक बाब म्हणजे राज्यात सगळ्यात दूरवरुव जाणारी संत मुक्ताबाई यांची पालखी खासगी गाडीने नेण्याची वेळ आलेली आहे. कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाने संत मुक्ताबाईंच्या पालखीला पंढरपूरपर्यंत नेण्यासाठी बसचे 96 हजार रुपये भाडं सांगितलं होतं. पण संस्थानला एवढं भाडं परवडणारे नसल्याने त्यांनी साठ हजार रुपयांमध्ये खासगी बस केली आणि पालखी पंढरपूर मध्ये पोहोचली. असाच प्रकार इतरही पालखींच्या बाबतीत झाल्याचं सांगितलं जातंय.

संतांची आणि वारीची महाराष्ट्राला प्रचंड मोठी परंपरा आहे. याच संतांच्या शिकवणुकीवर आजचा महाराष्ट्र उभा आहे, असे देखील वारंवार सांगितलं जाते. महाराष्ट्राची ओळख जपणारा हा उत्सव यंदा साधेपणाने साजरा झाला असताना सरकारला या नऊ पालख्यांच्या प्रवासाचा खर्च करणं कठीण होतं का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

Updated : 1 July 2020 6:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top