Home > Election 2020 > मंत्रीमंडळ विस्ताराची प्रतीक्षा अखेर संपली? मंत्रीपदासाठी काँग्रेसच्या ‘या’ नेत्यांची नावं चर्चेत

मंत्रीमंडळ विस्ताराची प्रतीक्षा अखेर संपली? मंत्रीपदासाठी काँग्रेसच्या ‘या’ नेत्यांची नावं चर्चेत

मंत्रीमंडळ विस्ताराची प्रतीक्षा अखेर संपली? मंत्रीपदासाठी काँग्रेसच्या ‘या’ नेत्यांची नावं चर्चेत
X

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. मंत्रीमंडळ विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी 30 तारखेला होणार असल्याचं समजतंय. हिवाळी अधिवेशनानंतर हा विस्तार होईल असं सांगितलं जात होतं. अधिवेशन पार पडताच आता नवे मंत्री शपथ घेतील.

काँग्रेसकडून अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, अमित देशमुख यांना कॅबिनेट मिळू शकतं. त्यात अशोक चव्हाणांना ऊर्जा किंवा सार्वजनिक बांधकाम खातं दिलं जाण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज चव्हाण हे मंत्री बनण्यास अनुत्सुक असून त्यांना काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद दिलं जाऊ शकतं.

हे ही वाचा...

Fact Check : ‘त्या’ शीख व्यक्तीला खरंच मुस्लिम युवकांनी झोडपलंय?

Jharkhand election result: : एका वर्षात भाजपच्या हातून ५ राज्य गेली?

जागतिक अर्थव्यवस्था एक ‘दुधारी’ तलवार!

सतेज पाटील, प्रणिती शिंदे, विश्वजीत कदम, संग्राम थोपटे यांच्यापैकी कोणाला संधी द्यायची यावर विचार सुरू आहे. आज संध्याकाळपर्यंत त्यासाठी काँग्रेस श्रेष्ठींकडून हिरवा कंदील मिळेल.

Updated : 23 Dec 2019 9:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top