माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर.अंतुले यांचे चिरंजीव नविद अंतुले यांचं निधन

16

राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर.अंतुले यांचे चिरंजीव नविद अंतुले यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांनी मुंबईतील सैफी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. लॉक डाऊन असल्यामुळे त्यांचा दफनविधी मुंबईत होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.

अनेक वर्षे राजकारणापासून दूर असलेल्या नविद अंतुले यांनी मागील वर्षी अचानक राजकारणात प्रवेश करून सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. माजी मुख्यमंत्री बेलिस्टर ए आर अंतुले यांचे सुपुत्र असणाऱ्या नविद अंतुले यांच्या राजकारण प्रवेशामुळे रायगडच्या राजकीय अपेक्षा उंचावल्या होत्या. त्यांची ही राजकीय इनिंग अल्पायुषी ठरली.

 

Comments