Home > News Update > शिवसेनेला कॉंग्रेस पाठींबा देणार का? कॉंग्रेस नेते सोनिया गांधींच्या भेटीला

शिवसेनेला कॉंग्रेस पाठींबा देणार का? कॉंग्रेस नेते सोनिया गांधींच्या भेटीला

शिवसेनेला कॉंग्रेस पाठींबा देणार का? कॉंग्रेस नेते सोनिया गांधींच्या भेटीला
X

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या निकालानं राज्यातील राजकीय पक्षाची चांगलीच गोची झाली आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता स्थापनेचं घोडं अजुनही गंगेत न्हालेलं नाही. त्यामुळं शिवसेना कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर सरकार स्थापन करेल का? या चर्चेला पुन्हा एकदा उधान आलं आहे. त्यातच शिवसेना आमच्यासमोर इतरही पर्याय आहेत, असं म्हणत भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे.

त्यातच राज्यातील राजकीय परिस्थिती संदर्भात राज्यातील कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार आणि माणिकराव ठाकरे आज कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राज्यात कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेना सरकार स्थापन करणार का? या चर्चेला पुन्हा एकदा उधान आलं आहे.

Updated : 1 Nov 2019 5:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top