भोकर विधानसभा मतदारसंघ लढत
Max Maharashtra | 20 Oct 2019 3:12 PM IST
X
X
यावर्षी भोकरची निवडणुक महत्वाची ठऱणार आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. भोकर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. नांदेड जिल्ह्यातील सर्वात चर्चेत असलेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे भोकर. याच मतदारसंघातून महाराष्ट्राला स्व. शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्या रुपाने दोन मुख्यमंत्री मिळाले. शंकरराव चव्हाण यांच्यानंतर अशोक चव्हाण या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते.
सहभाग निधी साठी इथे क्लिक करा
मात्र २०१४ साली अशोक चव्हाण हे नांदेड मधून लोकसभेसाठी निवडणुकीला उभे राहिले आणि खासदार बनून दिल्लीत गेले. त्यानंतर मग या मतदारसंघातून त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण विजयी झाल्या. भोकर विधानसभा मतदारसंघात राज्यातील सर्वाधिक उमेदवारी अर्ज करणारा मतदार संघ म्हणून चर्चेत आला आहे. काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल १४८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. हा राज्यातील सर्वात मोठा आकडा असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघ हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. जर सर्वच उमेदवार शेवटपर्यंत कायम राहिले तर मतदानासाठी नऊ वोटिंग मशीन लावाव्या लागणार आहेत. ७ सप्टेंबर हि अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख आहे. २०१४ मध्येही भोकर मध्ये राज्यातील सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. हा मतदार जरी कॉग्रेसचा बालेकील्ला असला तरी या मतदारसंघात अनेक कामे प्रंलबीत आहे. परत एकदा या मतदारसंघातून अशोक चव्हाण निवडणुक लढवताय.
Updated : 20 Oct 2019 3:12 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire