बच्चू कडू विजयी

अचलपूर मतदार संघातून बच्चू कडू यांनी आपला विजय साकारला. सुरवातीला बच्चू कडू पिछाडीवर होते, परंतु नंतर त्यांनी आघाडी घेतली आणि शेवट पर्यंत कायम ठेवत अनिरुद्ध देशमुख यांचा पराभव केला. सुरवातीला अनिरुद्ध देशमुख आघाडीवर होते परंतु नंतर बच्चू कडू यांनी आघाडी घेत विजय साकारला.

राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत अचलपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष  बच्चू कडू यांनी 59 हजार 234 एवढी मत घेत विजय मिळवला होता. अचलपूर विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर भाजप चे अशोक बनसोड होते. त्यांना 49 हजार 064 मते मिळाली. आणि त्यांचा 10 हजार 170 मतांनी पराभव झाला.