कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ लढत

कराड उत्तर मतदार संघ हा पूर्वीपासून शिवसेनेकडे होता व होवू घातलेल्या विधानसभेलाही तो शिवसेनेकडेच राहिल. त्यामध्ये कसलाही बदल होणार नाही. कराड उत्तर विधानसभा शिवसेना पूर्ण ताकदीने लढणार आहे. सातत्याने सुरू राहणाऱ्या विकासाच्या प्रक्रियेत लोकांच्या मागणीप्रमाणे कामे केली गेली पाहिजेत.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा

कराड उत्तर विधानसभा मतदार संघात विविध विकासकामांच्या माध्यमातून सर्वागीण विकास होत आहे, परंतू काही जण चुकीच्या मार्गाने पैसे मिळवून येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने स्वार्थी राजकारण करत कारखाना निवडणूक लढवायची आखणी करत आहेत. केवळ पत्रके वाटून व भूलथापा मारून राजकारण करण्यापेक्षा त्यांनी विकास काय केला ते सांगावे, असा सवाल करून विकासकामे कोण करत आहे हे येथील जनतेला चांगले माहित असल्याचा विश्वास आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. कराड उत्तरमधील काँग्रेस नेत्यांचे नाव न घेता त्यांनी टीकेची झोड उठवली. पंरतु यंदाच्या निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांना सरळ टक्कर देतील शिवसेनेचे र्धेयशिल माने.