Home > News Update > Whatsapp Message समजून घ्या नंतरच फॉरवर्ड करा...

Whatsapp Message समजून घ्या नंतरच फॉरवर्ड करा...

Whatsapp Message समजून घ्या नंतरच फॉरवर्ड करा...
X

मुंबई दि.९- लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात ५२८ गुन्हे दाखल झाले असून २७३ व्यक्तींना अटक केली आहे.अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ५२८ गुन्ह्यांची (ज्यापैकी ४१ N.C आहेत) नोंद ८ जुलै २०२० पर्यंत झाली आहे.

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १९९ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी २२२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, tiktok विडिओ शेअर प्रकरणी २८ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी १४ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, Youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ६१ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २७३ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी १०८ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.

बीड

बीड जिल्ह्यातील बीड शहर पोलिस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील नोंदणीकृत गुन्ह्यांची संख्या ५५ वर गेली आहे.सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात जातीय तेढ पसरु शकेल अशा आशयाचा मजकूर असणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती.त्यामुळे परिसरातील शांतता बिघडुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र सायबर, मुंबई यांच्या वतीने देण्यात आली आहे.

Updated : 9 July 2020 6:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top