डॉ. पल्लवी यांच्या प्रयत्नांना अखेर यश, सांगली तील 26 पैकी 24 कोरोना ग्रस्त रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

The total number of COVID-19 in world, The total number of COVID-19 in Mumbai, The total number of COVID-19 in Maharashtra,
The total number of COVID-19 in USA, The total number of COVID-19 in UAE, The total number of COVID-19 in Italy, coronavirus in India, coronavirus in india update,coronavirus in Italy, coronavirus in tamil nadu, coronavirus in india death ,Coronavirus, Corona, Mask, corona vaccine update, corona means, corona in Noida, corona vaccine usa, corona meaning English, corona meaning in tamil, कोरोना वायरस का गाना, कोरोनावायरस सॉन्ग, corona virus in Noida, कोरोनाव्हायरस व्हिडीओ, कोरोना खबर, कोरोना वायरस सॉन्ग, कोरोनावायरस के बारे में बताओ, कोरोना वायरस बद्दल माहिती, कोरोना वायरस कैसा होता है, कोरोना वायरस कब खत्म होगा, कोरोना वायरस की दुआ, कोरोना वायरस गाणे, कोरोना वायरस अपडेट,महाराष्ट्र एकूण रूग्ण, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, नागपूर, कल्य़ाण डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे, यवतमाळ, अहमदनगर, पनवेल, सातारा, उल्हासनगर, वसई विरार, पालघऱ, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, रत्नागिरी, कोल्हापूर, गोंदिया,coronavirus Live Updates, Global Death, India Death Update, lockdown, migration in India, Italy Death Update, united states Corona virus Update, USA death Update, toll India, new cases, new cases in Maharashtra

सांगली जिल्ह्यातील मिरज येथे अचानक 25 कोविड रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडली होती. या सर्व रुग्णांना मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णांपैकी काल चोवीस रुग्णांची दुसरी चाचणी नेगेटिव आल्याने मोठे यश मिळाले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी रुग्णांवर उपचार करणाऱ्या पथकाचे अभिनंदन केले आहे.

मिरज येथे अचानकपणे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याने या घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी गंभीर दखल घेतली होती. सांगली जिल्ह्यातील कोविडग्रस्त रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होऊ नये. यादृष्टीने मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेल्या कोविडग्रस्त रुग्णांवर तातडीने उपचार करून त्यांना पूर्णपणे बरे करण्याच्या दृष्टीने मुंबईतील ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली याच महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. विनायक सावर्डेकर आणि डॉ. प्रशांत होवाळ यांची त्रिसदस्यीय समिती नेमली होती

या समितीने तातडीने सांगली येथे जाऊन परिस्थितीवर नियंत्रण व उपचाराच्या नियोजनाचे काम 28 मार्च रोजी हाती घेतले होते. सांगली जिल्ह्यातील कोविडग्रस्त रुग्णांची संख्या लक्षात घेता गरज भासल्यास मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे 315 खाटांच्या कोविंड रुग्णालयात तातडीने रूपांतर करण्यात आले होते. याच ठिकाणी सिटीस्कॅन, एम. आर. आय. लिक्विड ऑक्सिजन, सोनोग्राफी, डायलिसिस, व पंधरा बेडचे आय.सी.यू. सज्ज ठेवण्यात आले होते.

याशिवाय कोविड तपासणी केंद्र तातडीने उभारून ते सुरूही करण्यात आले होते. या रुग्णालयात दाखल झालेले आणखी दोन कोविडग्रस्त रुग्णही लवकर बरे होतील आणि सांगली जिल्हा पूर्णपणे कोविड मुक्त करण्यात आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास डॉक्टर पल्लवी सापळे यांनी व्यक्त केला आहे.

सांगली येथे एकूण 25 कोविडग्रस्त रुग्ण दाखल करण्यात आले होते. यानंतर यात एका रुग्णांची भर पडली होती. ज्या 24 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यांचे 14 दिवसांसाठी संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार असून त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. या यशाबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी डॉक्टर पल्लवी सापळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.