सर्वपक्षीय बैठक: कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्ज मिळणार का?

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यभरातील नेते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारा मिटींगमध्ये सहभागी झाले होते. तर मंत्रालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात सरकारच्या वतीनं मिटींगला हजर होते. तर विरोधी पक्षातून भाजप च्या वतीनं विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, मनसे प्रमुख राज ठाकरे, शेकापच्या वतीनं आमदार जयंत पाटीलही मंत्रालयातून या बैठकीत सहभागी झाले होते.

या बैठकी मध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि आगामी खरीप हंगामाबाबत माहिती दिली. ज्या शेतकऱ्यांना आपल्या कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही. त्यांना पीक कर्ज मिळावे. म्हणून रिझर्व्ह बँकेशी बोलणे सुरु आहे. बियाणे व खरीप हंगाम व्यवस्थित मार्गी लावावा. म्हणून चांगले नियोजन केले आहे. कुठेही औषधे, बियाणे कमी पडणार नाही. कापूस खरेदीसंदर्भात केंद्राशी बोलणे सुरु आहे. ज्वारी आणि मका घेण्यासंदर्भात केंद्राने आदेश काढले आहेत. २५ हजार मेट्रिक टन ज्वारी आणि १५ हजार मेट्रिक टन मका खरेदी करण्यात येणार आहे. अशी अजित पवार यांनी दिली.