Home > News Update > सरकार फुटलं!

सरकार फुटलं!

सरकार फुटलं!
X

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात कधी सत्ता स्थापन होणार याकडे राजकीय वर्तुळाबरोबरच राज्यातील शेतकऱ्यांचं देखील लक्ष लागलं आहे. त्यातच आज राज्यातील दिग्गज नेते शरद पवार (shard pawar) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanavis) दिल्लीवारीवर आहेत.

आज त्यांनी दिल्ली येथे भाजपचे (BJP) अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. ही भेट महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याच्या संदर्भात होती. आणि या नुकसानी संदर्भात केंद्राकडून मदत मिळावी म्हणून अमित शाह यांची भेट घेतल्याचं मुख्यमंत्र्य़ांनी सांगितलं.

राज्याच्या मुख्यमंत्री या नात्यानं देवेंद्र फडणवीस यांनी ही भेट घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजही युतीचे मुख्यमंत्री आहेत. मात्र, या भेटी दरम्यान युती सरकारमधील कोणतेही मंत्री उपस्थित नव्हते. विशेष बाब म्हणजे युती सरकार मधील मुख्य घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचा एकही मंत्री अथवा प्रतिनिधी यावेळी उपस्थित नव्हता. मुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीस एकटेच अमित शाह यांच्या भेटीसाठी गेले होते.

त्यामुळं राज्यात असलेलं काळजीवाहू सरकार फुटलं आहे का? या काळजीवाहू सरकारला शिवसेनेचा पाठींबा नाही का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.

Updated : 4 Nov 2019 9:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top