जामनेर मध्ये अर्ज दाखल करण्यासाठी गिरीश महाजनांचा जीव धोक्यात घालून रोड शो

17

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक म्हणून परिचित असलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज त्यांच्या जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महाजन यांनी जामनेरमध्ये मुख्य रस्त्यावर रोड शो केला. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रे प्रमाणे तयार केलेल्या भल्यामोठ्या गाडीच्या टपावर जाऊन महाजन यांनी रोड शो केला. यावेळी जामनेर तालुक्यातून हजारोंच्या संख्येनं भाजप कार्यकर्ते या रोड शोला उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन यांच्यामुळे जामनेर विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

Comments