Home > News Update > विखे पाटीलांचं वक्तव्य ‘ते’ 2000 परत द्या, शेतकरी मुलाने पाठवला चेक

विखे पाटीलांचं वक्तव्य ‘ते’ 2000 परत द्या, शेतकरी मुलाने पाठवला चेक

विखे पाटीलांचं वक्तव्य ‘ते’ 2000 परत द्या, शेतकरी मुलाने पाठवला चेक
X

निवडणुकीचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे नेते मतदारांना प्रलोभन देत असतात. निवडणुकीत वाटलेले पैसे, वस्तू निवडणूक हरल्यानंतर परत देखील घेत असतात. मात्र, मत नाही दिलं तर सरकारी योजनांमधील नागरिकांना दिलेले पैसे द्या असं कोणताही नेता आजवर बोलला नाही.

आता ही किमया देखील आपल्या महाराष्ट्रातील एका खासदाराने केली आहे. हे खासदार आहेत. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील. यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रचारसभेत

'पालकमंत्र्यांनी विरोधी उमेदवाराच्या सभेला जाणाऱ्या लोकांची यादी काढावी. त्या सभेला जाणाऱ्या अनेकांच्या खात्यात मागील महिन्यात मोदींनी दोन हजार रुपये जमा केले आहेत. मोदींचे हे दोन हजार रुपये चालतात, मग त्यांचे कमळ का नको?, तुम्हाला कम‌ळ चालत नसेल तर ते पैसे परत करा, आम्हाला गरीबांच्या कल्याणासाठी तरी वापरता येतील,'

असं शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होते.

त्यानंतर दत्ता ढगे या शेतकऱ्याच्या मुलाने विखे यांच्या या वक्तव्याचा निषेध म्हणून विखे यांना 2 हजार रुपयांचा चेक स्पीड पोस्टाने पाठवला आहे. दोन हजार रुपयात शेतकऱ्यांची किंमत करणाऱ्या विखे पाटलांना या शेतकरी पुत्राने एक निवेदन दिलं असून या निवेदनात ...

'आम्ही सुजय विखेंना दोन हजार रुपये पाठवत आहोत. त्यांनी लोणीमध्ये कमळ सोडून अन्य कुणालाही मत द्यावे. असं म्हणत विखे पाटलांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. तसंच शेतकऱ्यांची अशा प्रकारे थट्टा करणाऱ्या भाजप नेत्यांना मतदान करु नये अस आवाहन देखील त्यांनी या पत्रात केलं आहे.

https://youtu.be/ZNxG3ktvwHM

https://youtu.be/7qKiAeuQlTY

Updated : 8 Oct 2019 4:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top