Home > News Update > सोयाबीनच्या बोगस बियाण्यांच्या कारस्थानामागे महाबीज, एका मंत्र्यांचाच गंभीर आरोप

सोयाबीनच्या बोगस बियाण्यांच्या कारस्थानामागे महाबीज, एका मंत्र्यांचाच गंभीर आरोप

सोयाबीनच्या बोगस बियाण्यांच्या कारस्थानामागे महाबीज, एका मंत्र्यांचाच गंभीर आरोप
X

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या त्रासाला राज्याचे कृषीखाते जबाबदार आहे असा गंभीर आरोप राज्यमंत्री बच्चू कडून यांनी केला आहे. आपल्या रोखठोक भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले बच्चू कडू यांनी आपल्याच सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात घेतल्या सोयाबीनचं पीक संकटात सापडलं आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार परिसरात सोयाबीन पिकावर अज्ञात रोग आलाय. याची पाहणी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी स्थानिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकार गंभीर नाही, आधी बियाणे बोगस निघालं, आता पिकावर रोग येतात आहे. त्यामुळे राज्यातील कृषी खात झोपलं आहे की काय असा सवाल देखील त्यांनी विचारत सरकारला घरचा आहेर दिलाय.

https://youtu.be/G5tpn3YLmSc

“सोयाबीनचे बियाणे जेव्हा बाहेर येते तेव्हा तिथेच काहीतरी काळे बेरे केले जाते. माझा तर महाबीजवर आरोप आहे की यांनी मार्केटमधले सगळ्यात बोगस बियाणे घेतले आणि 2 हजार, 3 हजार किंमतीचे बियाणे 8 हजार रुपयांना विकले असा माझा स्पष्ट आरोप आहे,” असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. दरवर्षी सोयाबीनचे बोगस पिक येते. त्यामुळे यात ते दोषी आढळतील किंवना ज्या कंपनीचे बियाणे बोगस आढळेल त्याच्या मालकाला चोप दिला पाहिजे असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

Updated : 23 Aug 2020 4:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top