Home > News Update > मंदावलेल्या अर्थचक्राला गती मिळणार, राज्य सरकारचे १६ हजार कोटींचे गुंतवणूक करार...

मंदावलेल्या अर्थचक्राला गती मिळणार, राज्य सरकारचे १६ हजार कोटींचे गुंतवणूक करार...

मंदावलेल्या अर्थचक्राला गती मिळणार, राज्य सरकारचे १६ हजार कोटींचे गुंतवणूक करार...
X

राज्यात कोरोनाचे संकट गंभीर झालेले आहे. तर दुसरीकडे अर्थचक्राला फटका बसलेला असताना राज्य सरकारच्या मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 मध्ये 16 हजार कोटींचे गुंतवणूक करार झाले आहेत. एकीकडे कोरोनाशी लढतांना आज आपण 16 हजार कोटींचे सामंजस्य करार करून महाराष्ट्रावर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ करून दाखवणार आणि यापुढे देखील राज्यात येणाऱ्या लहान मोठ्या उद्योगांना त्यांचे उद्योग स्थापण्यात कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

उद्योग विभागाच्यावतीने मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 (भाग दोन)ला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी सुरूवात करण्यात आली. यावेळी विविध देशांचे वाणिज्यदूत, गुंतवणूकदार. उद्योगपती ऑनलाइन उपस्थित होते. विविध 12 देशांतील गुंतवणुकदारांसोबत 16 हजार 30 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले.

अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी देशांतील तसेच काही भारतीय गुंतवणुकदारांसोबत हे करार करण्यात आले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उद्योगमंत्री यांच्या उपस्थित व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

हे ही वाचा...

शेतकऱ्यांनो बॅंक कर्ज देताना अडवणूक करत आहेत का? ‘या’ अधिकाऱ्याकडे करा तक्रार

शेतकऱ्यांनो पेरणी करत आहात का? तर ही काळजी नक्की घ्या…

उद्धव ठाकरे यांचं रोजगारासाठी फडणवीसांच्या पावलावर पाऊल, फडणवीसांनी सुरु केलेली ‘ही’ योजना नेणार पुढे…

कोणत्या कंपन्यांसोबत किती कोटींचे करार

एक्सॉन मोबिल(अमेरिका)ऑइल अँड गॅस- इसाम्बे, रायगड 760 कोटी

हेंगली (चीन) इंजिनिअरिंग- तळेगाव टप्पा क्रमांक-2, पुणे 250 कोटी आणि 150 रोजगार

असेंडास (सिंगापूर) लॉजिस्टिक- चाकण-,तळेगाव, पुणे, भिवंडी, ठाणे 560 कोटी

वरूण बेव्हरिजेस (भारत) अन्न प्रक्रिया- सुपा, अहमदनगर 820 कोटी

हिरानंदानी ग्रुप (भारत) लॉजिस्टिक- भिवंडी- चाकण तळेगाव 150 कोटी आणि 2500 रोजगार

असेट्ज (सिंगापूर)डेटा सेंटर- टीटीसी, ठाणे- महापे 1100 कोटी आणि 200 रोजगार

इस्टेक (दक्षिण कोरिया) इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन - रांजणगाव, पुणे 120 कोटी आणि 1100 रोजगार

पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन जेव्ही विथ फोटोन ( चीन) ऑटो-तळेगाव 1000 कोटी रोजगार 1500

इसाम्बे लॉजिस्टिक (भारत) लॉजिस्टिक- रायगड 1500 कोटी आणि रोजगार 2500

रॅकबँक(सिंगापूर) डेटा सेंटर- ठाणे, हिंजेवाडी, पुणे 1500 कोटी

युपीएल( भारत) केमिकल- शहापूर, रायगड 5000 कोटी आणि रोजगार 3000

ग्रेट वॉल मोटर्स (चीन) ऑटोमोबाईल तळेगाव- पुणे 3770 कोटी आणि 2042

वर्ल्ड असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सीज (डब्ल्यूएआयपीए) आणि यूएस इंडिया पार्टनरशिप फोरम (यूएसआयएसपीएफ) सह द्विपक्षीय भागीदारी करारावर यावेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

दरम्यान, या उद्योगांसाठी राज्यात सुमारे चाळीस हजार हेक्टर जमीन राखीव ठेवलेली आहे. विविध परवान्याऐवजी आता 48 तासांत महापरवाना दिला जाणार आहे. याशिवाय औद्योगिक कामगार ब्यूरो सुरू केला जाणार आहे अशी माहितीही उद्योगमंत्री सुभाष देसाई त्यांनी दिली.

Updated : 16 Jun 2020 2:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top