Home > News Update > लोणार सरोवराचा रंग बदलला, काय आहे कारण?

लोणार सरोवराचा रंग बदलला, काय आहे कारण?

लोणार सरोवराचा रंग बदलला, काय आहे कारण?
X

जगातील अनेक भौगोलिक शास्त्रज्ञ महाराष्ट्रातील ज्या लोणार सरोवराचा अभ्यास करत असतात. त्या लोणार सरोवरातील पाण्याचा रंग गुलाबी झाला आहे. उल्कापातामुळे निर्माण झालेल्या या खाऱ्या पाण्याच्या सरोवराचा रंग एरवी निळ्या-हिरव्या रंगाचा असतो. मात्र, अचानक रंग बदलल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात असून याचा शोध घेण्याचं काम सुरु आहे.

दरम्यान कोरोना विषाणूमुळे गेले तीन महिन्यांपासून लॉकडाउन असल्यामुळे सरोवर परिसरात कोणीही अभ्यासक फिरकला नाही. गेल्या आठवड्यात निसर्ग चक्रीवादळाच्या दरम्यान, झालेल्या पावसामुळे आणि लॉकडाउन ने थोडी ढिल दिल्यामुळे नागरिक सरोवर परिसरात फिरू लागले आहेत.

हे ही वाचा...


राज्यातील मंत्री आणि मुख्य सचिवांचा संघर्ष शिगेला, मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी

मुख्य सचिव अजॉय मेहतांवर अशोक चव्हाण यांची नाराजी

राज्यातील हा जिल्हा कोरोनामुक्त !

अरविंद बनसोड मृत्यू प्रकरणाच्या चौकशीबाबत सरकारचा निर्णय

या नागरिकांना लोणार सरोवरातील पाण्याचा रंग गुलाबी झाल्याचे दिसून आलं आहे. त्यामुळे परिसरात फिरणारे नागरिक मोबाईलमध्ये याचे चित्रण करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. मात्र, पाण्याचं रंग गुलाबी का झाला याबाबत अद्यापपर्यंत ठोसं असं कारण समोर आलेलं नाही. या संदर्भात प्रशासन आणि सऱोवर समितीच्या सदस्यांमध्ये मतभिन्नता दिसून येत आहे.

या संदर्भात लोणारचे तहसिलदार सैफन नदाफ यांनी माध्यमांना माहिती दिली. "गेल्या दोन-तीन दिवसांत पाण्याचा रंग बदलल्याचं जाणवत आहे. वनविभागाला या ठिकाणची सँपल्स घ्यायला सांगितलं आहे. त्यांच्या तपासणीनंतरच यामागचं कारण कळू शकेल", अशी माहिती तहसीलदार सैफन नदाफ यांनी दिली आहे. काय आहे लोणार सरोवर?

लोणारचे सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे. याची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली. लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे.

या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत. सरोवराची निर्मिती ५२,००० ± ६००० वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते. पण २०१० साली प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात सरोवराचे वय ५,७०,००० ± ४७,००० वर्ष इतके वर्तवण्यात आलं आहे. अमेरिकेतील स्मिथसोनिअन संस्था, युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी यासारख्या संस्थांनी या सरोवरावर बरेच संशोधन केले आहे.

Updated : 11 Jun 2020 4:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top