Home > News Update > लोकशाहीर संभाजी भगत यांचा १८ ऑगस्टला बदलापूरमध्ये कार्यक्रम

लोकशाहीर संभाजी भगत यांचा १८ ऑगस्टला बदलापूरमध्ये कार्यक्रम

लोकशाहीर संभाजी भगत यांचा १८ ऑगस्टला बदलापूरमध्ये कार्यक्रम
X

लोकशाहीर संभाजी भगत यांच्या "कलासंगिनी महाराष्ट्र" या सांस्कृतिक संघटनेच्या वतीने येत्या १८ ऑगस्ट रोजी बदलापूरमध्ये संविधान जलशाचा बहुरंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आहे.

पुरोगामी चळवळीच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी संभाजी भगत हे प्रयत्न करीत आहेत. शाहिरी कलापथकातून हा प्रचार-प्रसार झपाट्याने होतो हा त्यांचा अनुभव आहे. त्यामुळे राज्यासह देशभरात नवतरुणांचे कलापथक उभे राहावे यासाठी ते झटत आहेत. अशाच एका कलापथकाचा कार्यक्रम १८ ऑगस्ट रोजी आहे. ज्याची जोरदार तयारी सध्या बदलापुर येथे सुरू आहे. त्यांच्या सरावाची ही झलक...

Updated : 15 Aug 2019 11:17 AM GMT
Next Story
Share it
Top