Top
Home > Max Political > LIVE शरद पवार: राज्यातील राजकीय परिस्थितीवर काय बोलणार?

LIVE शरद पवार: राज्यातील राजकीय परिस्थितीवर काय बोलणार?

LIVE शरद पवार: राज्यातील राजकीय परिस्थितीवर काय बोलणार?
X

आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार फेसबूक द्वारे पुन्हा एकदा कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. यावेळी सुरुवातीला त्यांनी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली.

शहरातील ठराविक पॉकेट मध्ये करोना वाढतोय, झोपडपट्टी भागात कोरोना वाढतोय. सोशल डिस्टंसिंग ची इच्छा असूनही जागेअभावी त्यांना पाळता येत नाही.

यंत्रणा अतिशय कष्टाने काम करतायत, त्याचे परिणाम दिसतायत

कोरोनाचे परिणाम अनेक गोष्टींवर झालाय.

अर्थकारणावर गंभीर परिणाम झालेला आहे. शासनाच्या अर्थकारणावर ही परिणाम. २०-२१ च्या अर्थसंकल्पात ३.७६ लाख कोटी चं उत्पन्न अपेक्षित होतं त्यात ४०% घट होईल असं दिसून येतंय याची कल्पना यावी म्हणून देशाच्या अर्थमंत्र्यांना कल्पना दिलीय.

भारत सरकारने राज्यांना अधिक शक्ती दिली पाहिजे. राज्याची यंत्रणा लोकांना मदत करण्यासाठी फिल्ड वर लागलीय

केंद्राची यंत्रणा संसाधनं उपलब्ध करून देण्यासाठी तसंच जागतिक पातळीवर काय सुरू आहे याचा अंदाज घेण्यात कामी लागलीय

शेती साठी मोठ्या सवलती देण्याची गरज आहे. पीककर्जाच्या व्याजाचा दर शून्यावर आणला पाहिजे

उद्योगासाठी ही अनेक महत्वाचे निर्णय घेण्याची गरज आहे. रिजर्व बँकेच्या धोरणात याचं प्रतिबिंब पडायला पाहिजे

रिजर्व बँकेने सूचना करू नयेत आदेश द्यायला पाहिजे

बेरोजगारीची समस्या मोठी असणार आहे. कारखानदारीवर मोठा परिणाम झालाय. कोरोना नंतर पुन्हा जेव्हा सर्व सुरू होईल तेव्हा मोठा विचार करावा लागेल

सोशल डिस्टंसिंग चा विचार कायम करावा लागणार आहे

सार्वजनिक वितरण व्यवस्था सक्षमपणे काम करतेय.

सामाजिक संस्था, एनजीओ मदत कार्य करतायत.

स्थलांतरित मजूर, अनिवासी, विद्यार्थी अडकलेले आहेत. यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने कार्यालय उघडलंय. 02222027990 02222023039

बँकांना नऊ दिवस सुट्टया आहेत. त्यामुळे गोंधळून जाऊ नका. इतर दिवस त्या काम करणार आहेत, त्यामुळे नियोजन करा.

पोलिसांवर हल्ले करण्यांवर कडक कारवाई झालेली पाहायला मिळेल

Updated : 30 April 2020 5:42 AM GMT
Next Story
Share it
Top