Home > News Update > LIVE: अर्थमंत्री निर्मला सितारमण: पायाभूत सुविधांसाठी करणार 8 मोठ्या घोषणा

LIVE: अर्थमंत्री निर्मला सितारमण: पायाभूत सुविधांसाठी करणार 8 मोठ्या घोषणा

LIVE: अर्थमंत्री निर्मला सितारमण: पायाभूत सुविधांसाठी करणार 8 मोठ्या घोषणा
X

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेज च्या संदर्भात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक, स्थलांतरित मजूर, वीज कंपन्या, स्थावर मालमत्ता, वित्त संस्था आणि कृषी क्षेत्रासाठी आर्थिक मदतीच्या घोषणा केल्या आहेत. आज याच पॅकेजच्या चौथ्या टप्प्यामध्ये पायाभूत सुविधांसाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण आठ मोठ्या घोषणा करत आहेत.

8 विविध क्षेत्रांसाठी घोषणा...

कोळसा, खनिज, संरक्षण उत्पादन,हवाई क्षेत्र, वितरण कंपन्या, अवकाश क्षेत्र या क्षेत्रांसाठी आज भारत सरकार विशेष पॅकेज घोषित करत आहे.

बिझनेस फ्रेंडली भारत...

भारताला बिझनेस फ्रेंडली देश बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. देशात गुंतवणूक वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रत्येक मंत्रालयात स्वतंत्र विभाग तयार करणार

कोळसा क्षेत्रात खाजगीकरण...

कोळसा क्षेत्रात खानींचा लिलाव करण्यात येईल. त्यामुळं यापुढं खाणींचं खाजगी उत्खनन करण्यात येईल. जगातील कोळसा उत्पादक देशामध्ये आपल्या देशाची पहिल्या तीन देशांमध्ये समावेश होतो. त्यामुळं आपल्या देशातील कोळसा उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने 50 हजार कोटींची घोषणा केली आहे.

Updated : 16 May 2020 10:55 AM GMT
Next Story
Share it
Top