Home > News Update > येस बँकेचे धडे – संजीव चांदोरकर

येस बँकेचे धडे – संजीव चांदोरकर

येस बँकेचे धडे – संजीव चांदोरकर
X

दोन टक्के जास्त व्याजासाठी मुद्दल धोक्यात घालण्यात अर्थ नसतो ! महागाई व वाढते राहणीमान यामुळे कोट्यवधी कुटुंबाना त्यांची मासिक उत्पन्ने कमी पडतात. मग साहजिकच विचार येतो की आपण पै पै बाजूला काढून ज्या बचती केल्या आहेत. त्यावर जास्त व्याज मिळाले तर तेव्हढाच हातभार लागेल. महिन्याला ५००-६०० रुपये जास्त मिळाले तरी जास्त भाज्या घेता येतात. असा विचार करणाऱ्या कितीतरी गृहिणी आहेत.

मग टीव्ही वरच्या “तुम्ही झोपलेले असताना तुमच्या बचतींना तुमच्यासाठी उत्पन्न मिळवू दे“ अशा आकर्षक जाहिराती, रस्त्यावरचे बिलबोर्ड आणि माऊथ पब्लिसिटी त्यात झकपक कपडे केलेले मार्केटिंग स्टाफ, गुळगुळीत माहितीपत्रके / ब्रोशर, आणि चकचकीत कार्यालये यांनी प्रभाव पडतो. यामुळे बचतदार अनेक बँकात, सहकारी पतपेढ्यात, चीट फंडात, म्युच्युअल फंडात आपल्या बचती गुंतवतात. पण वित्त क्षेत्रातील मूलभूत नियम आहे. परतावा (रिटर्न) आणि जोखीम (रिस्क ) एकत्रच पहायची असते; बाकी सगळ्या, सगळ्या, सगळ्या गोष्टी दुय्यम असतात.

आपली वित्तीय साक्षरता कमी आहे व्याज कमी मिळाले तरी चालेल पण माझे मुद्दल मी पणाला नाही लावू शकत. असे ज्यांना कोणाला वाटेल, त्यांनी इतर कशालाही बळी पडू नये, भारत सरकारच्या मालकीच्या सार्वजनिक बँकांमध्ये आपल्या जास्तीत जास्त बचती ठेवाव्यात.

Updated : 8 March 2020 3:37 AM GMT
Next Story
Share it
Top